लाडूद बद्दल

 नाशिक हा पर्यटन जिल्हा म्हणुन नावारुपाला आलेला आहे. लहानमोठ्या पंधरा तालुक्यांनी मिळून आपला नाशिक जिल्हा बनलेला आहे. या १५ तालुक्यातील आपला बागलाण ऐतिहासिक वारसाला भलेला, निसर्ग सौंदर्याने नटलेला, लहानलहान गाव मिळून बनलेला असा तालुका म्हणजे बागलाण. या तालुक्या मध्ये सोमपूर ते जायखेडा या मुख्य रस्त्याला लागून असणारा,   चहु बाजूनी सुंदर निसर्गाच्या कुशीत लपलेला आपला छोटासा निसर्गरम्य गाव म्हणजे लाडूद गाव. सामाजिक तसेच राजकीय वारसा असलेल्या आपल्या गावात 5 वर्ष आमदार असलेले श्री. उमाजीमंगळूबोरसेतसेचसध्याचेआमदारवमागील5वर्षआमदारपदभूषवलेलेश्री. दिलीप मंगळू बोरसे साहेब यांचे निवासस्थान, पहिलवान लोकांचे गाव म्हणून संपूर्ण जिल्ह्यात गावची ओळख, त्या वरून लाडूद या नावाचा उगम झाला. बागलाण तालुक्यापासून अगदी २५ किलोमीटर अंतरावर असलेला आपला छोटासा गाव.

गावाची लोक संख्या सुमारे १३३६ एवढी आहे. या गावात विविध जाती धर्माचे लोक राहतात. ”पाणी म्हणजे जीवनया प्रमाणे लोकांचे जीवन अवलंबून असलेल्या पाण्याची उपलब्धता मोठ्या प्रमाणात असल्याने गाव सुजलाम सुफलाम आहे. त्याच प्रमाणे या गावात विविध निसर्गरम्य परिसर, आकर्षक मंदिरे प्रेक्षणीय स्थळे म्हणून ओळखली जातात.

अशा या छोट्याश्या गावाचा कारभार चालविण्यासाठी ०१ एप्रिल १९९४ साली लाडूद ग्रामपंचायतीची स्थापना झाली. या पूर्वी लाडूद गावचा कारभार गावचे पंच चालवीत. यात गावच्या मुख्य चावडी वर किंवा मुख्य चौकाच्या ठिकाणी गावची सभा भरवली जाई. ग्रामस्थांच्या उपस्थितीत गावचे मुख्य गावकरी व पंचांनी घेतलेला निर्णय हा अंतिम मानला जाई. मात्र ग्रामपंचायतीची स्थापना होण्या पूर्वी रामालाडू सावंत यांच्या घरी हि सभा भरवली जायची. हे पंचायतीचे कामकाज सतत १० वर्षे त्यांच्या घरी घेण्यात आले. त्यानंतर सर्वा नुमते निर्णय घेऊन व शासनाच्या तरतुदी नुसार ग्रामपंचायतीच्या स्थापनेचा निर्णय घेण्यात आला.

या गावात स्वतंत्र ग्रामपंचायत ऑफिस, रास्त दराचे धान्यदुकान ,पुर्ण प्राथमिक शाळा, अंगणवाडी केंद्र, स्वतंत्र स्मशान भुमी, स्वतंत्र दफन भूमी तसेच गावात डांबरी रस्ते, गावांतर्गत कोन्क्रीट रस्ते, माध्यमिक आश्रम शाळा, कॉलेज उपलब्ध आहे.

 गावाला मिळालेले पुरस्कार

)निर्मल ग्रामपुरस्कार (२००९)

)हागणदारी मुक्त  अधिक घोषित गाव

३)संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानसन २०२३-२४ जिल्हास्थर द्वितीय

ग्रामपंचायतकार्यकारणी

.क्र.वार्डक्र.सभा सदाचे नावपदप्रवर्गमोबईलनं
सौ.सुंनदा सुभाष ठाकरेसरपंचसर्व साधारण9552944245
०3श्री. तुळशीदास दादा जीठाकरेउपसरपंचसर्व साधारणस्त्री7020942525
०१सौ.कोकिळा विनोदपागेसभासदसर्व साधारणस्त्री7620701903
०१सौ. सारिका विनोद ठाकरेसभासदसर्व साधारण8975515353
०२सौ. अनिता सुनील बोरसेसभासदना.मा.प्र.स्त्री9529602979
०२श्री. गुलाब सखाराम बोरसेसभासदसर्व साधारणस्त्री7666105086
०३श्री. रामदास चिंतामण बोरसेसभासदना.मा.प्र.8767863697

 अधिकारीवर्ग

.क्र.कर्मचायाचेनावहुद्दामोबईलनं
श्री.के.एस.राठोडग्रामसेवक९४०५६१३२६४

 कर्मचारीवर्ग

.क्र.कर्मचायाचेनावहुद्दामोबईलनं
श्री.दिपक बळीराम जगतापशिपाई९४०५६८४१७१
श्री. बबलू सुभाष माळीनळ कामगार९४२०९९६४३६
श्री. सुलतान अहमद पिंजारीडाटा ऑपरेटर९४२१२६९३८७