मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान ग्रामपंचायत लाडूद माननीय आमदार दिलीप मंगळ बोरसे साहेब यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 पर्यंत स्वच्छता हीच सेवा अंतर्गत गावात माननीय आमदार दिलीप मंगळू बोरसे साहेब यांच्या उपस्थितीत ग्रामस्थ व विद्यार्थी यांच्याकडून गावात स्वच्छता करण्यात आली व स्वच्छता शपथ घेण्यात आली
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत गावात माननीय आमदार दिलीप बोरसे साहेब यांचे असते वृक्ष लागवड करण्यात आली
कर्मयोगी अभियान अंतर्गत व मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान अंतर्गत 2 ऑक्टोबर 2025 रोजी भारत सरकार यांच्याकडून उपस्थित कश्यप साहेब यांच्या उपस्थितीत ग्रामसभा घेण्यात आली व वृक्ष लागवड करण्यात आली
अभियान अंतर्गत स्मशानभूमी मधील साफसफाई ग्रास कटर च्या साह्याने करण्यात आली व झाडांना पाणी साठी आळे करण्यात आले
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज योजनेअंतर्गत लाडूत गावात सार्वजनिक इमारतीवरील पावसाचे पाणी संकलन करणे रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम बसवण्यात आले
आधी कर्मयोगी अभियानासाठी ग्रामसभेसाठी उपस्थित भारत सरकारकडून आलेले कर्नल कश्यप साहेब यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली त्यावेळेस ग्रामपंचायत कार्यकारणी व माननीय आमदार दिलीप मंगळ बोरसे साहेब यांच्या पत्नी उपस्थित होत्या
अभियान कालावधीत आदी कर्मवीर अभियान राबवण्यात आल्यावर गावाचा सामाजिक नकाशा काढण्यात आला तसेच गावात आधी कर्मयोगी केंद्र स्थापन करण्यात आले सदर कार्यक्रम पाणी करताना दिल्लीवरून भारत सरकार खात्याचे कर्नल कश्यप साहेब घटकास अधिकारी अतुल पाटील साहेब ग्रामपंचायत कार्यक्रम सर्व उपस्थित होते
मुख्यमंत्री पंचायत राज अभियान अंतर्गत जिल्हा परिषद शाळा लाडूद लोकवर्गणीतून मैदान तयार करण्यात आले
मुख्यमंत्री पंचायतराज अभियान अंतर्गत लाडू गावात ग्रामसभेत नाविन्यपूर्ण उपक्रमाबाबतचे ठराव घेण्यात आले त्यामध्ये गावात संपूर्ण दारूबंदी संपूर्ण गुटखाबंदी, प्लास्टिक बंदी संध्याकाळी सात ते आठ एक तासाच्या वेळेत गावात विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचा वेळ निश्चित करून त्या वेळेत मोबाईल व टीव्ही बंद करणे बाबतचा नाविन्यपूर्ण उपक्रम करण्यात आला तसेच गावात मुलगी जन्माला आल्यावर मातापित्यांकडून पाच वृक्ष लागवड करण्याबाबत नाविन्यपूर्ण उपक्रम करण्यात आला त्या संदर्भात गावात व सर्व दुकानावर जाऊन नोटीस बजावून प्रचार प्रसिद्धी करण्यात आली
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत गावात पानंद रस्ते श्रमदानातून लोकसहभागातून दुरुस्त करण्यात आले व नवीन रस्ते करण्यात आले
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत लाडू कार्यक्षेत्रात कच्चे बंधारे वनराई बंधारे मातीनाला बांध शेततळे श्रमदानातून लोकसभागातून बांधण्यात आले
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत आरोग्य विभागामार्फत कॅम्प आयोजित करून अन्य मुक्त गाव करण्यासाठी कॅम्प लावण्यात आला व सोबत आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी काम आयोजित करून कारवाई करण्यात आली
ग्रामपंचायत लाडू स्मशानभूमीत रस्ता संरक्षण भिंत, सोलर स्टेट लाईट,पाण्याची सोय,दहन शेड व वृक्ष लागवड करण्यात आली आहे
मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियानांतर्गत पशुवैद्यकीय सेवेसाठी खोडा बसविण्यात आला
मुख्यमंत्री समृद्ध योजनेअंतर्गत ग्रामपंचायत लाडुद कार्यक्षेत्रातील जिल्हा परिषद शाळा लाडुद येथे अभ्यासिका तयार करण्यात आली
मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत योजनेअंतर्गत लाडूद गावातील सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले
गावात ओला कचरा व सुका कचरा वेगळा करून सदर कचरा घंटागाडीने जमा करून सदर कचऱ्याचे व्यवस्थापन कंपोस्ट पीठ बायोगॅस व गांडूळ खता मार्फत व्यवस्थापन केला जातो केला जातो
मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियानांतर्गत गावात एकूण सात बायोगॅस बांधून पूर्ण करण्यात आले
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामपंचायत कार्यालय लाडूद इमारतीवर सोलर बसवण्यात आले
मुख्यमंत्री पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामपंचायत लाडूत रॅम करण्यात आले सरपंच उपसरपंच केबिन ग्रामपंचायत अधिकारी केबिन आपले सरकार सेवा केंद्र केबिन कर्मचारी केबिन ग्रामपंचायत सभागृह वेगवेगळी बैठक व्यवस्था करण्यात आली
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत गावात रंगरंगोटी स्वच्छतेचे संदेश व अभियान जनजागृती करण्यात आली
मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियानांतर्गत जिल्हा परिषद शाळा लाडूद येथे सोलर बसवण्यात आले
ग्रामपंचायत लाडूद अंतर्गत गावात दिशादर्शक पाट्या लावण्यात आले आहे
मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियान अंतर्गत ग्रामपंचायत लाडूद येथे तक्रारपेटी लावण्यात आली